मुंबई : मुंबई कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्धच्या मुंबई कसोटी (IND vs NZ) सामन्यात पुनरागमन करणे कठीण असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू. असं भाष्य रचिन रवींद्र याने केलं आहे.
भारताकडून मिळालेल्या 540 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने आत्तापर्यंत 6गड्यांच्या मोबदल्यात 162धावा केल्या असून सामन्याला अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रवींद्र म्हणाला की, 60 धावांवर बाद होणे नेहमीच अवघड असते, अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या. ही आमची सर्वोत्तम कामगिरी नव्हती पण आम्हाला माहित होते की आम्हाला दुसरा डाव मिळाला की आम्ही तेथून लढत राहू.
दुस-या डावात भारताच्या 3 विकेट्सबद्दल रवींद्र म्हणाला की, या खेळासाठी तुम्ही जे काही केले त्यावरून शिकून पुढच्या गोष्टीकडे जाणे महत्त्वाचे आहे, जे घडले त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक नाही.
चौथ्या दिवशी रवींद्र फिरकीला पूर्णपणे अनुकूल अशा खेळपट्टीवर फलंदाजी करेल. किवी संघाकडे अजून 4विकेट शिल्लक आहेत पण सामना भारतीय संघाच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडच्या संघाला सामना जिंकण्यासाठी मोठ्या धावसंख्येचे लक्ष पार करण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- कारण नसतांना विरोध करणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट; भुजबळांचा फडणवीसांना टोला
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- ‘भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या शेपटा’
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर
- येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील


