नाशिक : नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था म्हणजेच ‘मित्रा’च्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदवला. तसेच कार्यक्रमाला स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ‘बिचारे’ असा उल्लेख केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. परंतू, भुजबळ यांनी कोणत्या संदर्भाने हा शब्द वापरल्याचे लक्षात येताच उपस्थितानींही त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली.
‘ग्लोबल वॉर्मिंग इत्यादींमुळे जिथे पाऊस पडायला हवा तिथे पडत नाही. जिथे पडतो तिथे खूप पडतोय. कधी दुष्काळ पडतोय. कधी पाऊस सगळेच वाहून नेतो. इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. या सगळ्याचं ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे’, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले.
छगन भुजबळ यांनी संस्थेचे नाव ‘मित्रा’ आणि पंतप्रधान मोदी सतत आपल्या भाषणात वापरत असलेला शब्द ‘मित्रों’ यावर देखील भाष्य केले. ‘मित्रा’ हे संस्थेचे नाव मला खूप आवडले. आपले पंतप्रधान वारंवार भाषणात ‘मित्रों’ असे बोलतत. त्यांच्यामुळे हा शब्द प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे आता आपली मित्रा हे संस्था देखील नाव उंचावेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

