Share

आता खंडणीचा पैसा कोलकात्यातून कसा फिरवला गेला हे स्पष्ट होईल; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केली आहे. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

यावरून राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून ईडीच्या कारवाईच्या भाजप नेत्यांनी स्वागत केले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ईडी चौकशीमुळे दूध का दूध आणि पानीका पानी होईल, असा टोला देखील लगावला आहे. ‘अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी,’ अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!