अहमदनगर : मराठा आरक्षण स्थगिती नंतर राज्याचे राजकारण तापले आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले आहेत. अशात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बालासाहे थोरात यांनी मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये, तर त्यांनी साथ द्यावी असे आवाहन केले आहे.
“मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णपणे काँग्रेस किंवा आघाडी सरकार योग्य ती काळजी घेत आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्याऐवजी सगळ्यांनी मदत करणं गरजेचे आहे. ज्यावेळेला त्यांचे सरकार होते, त्यावेळेस आम्ही कोणतेही राजकारण केलं नाही. प्रत्येक गोष्टीत आमची साथ होती. आता त्यांनी देखील साथ दिली पाहिजे,” असं इच्छा थोरातांनी व्यक्त केली आहे.
“शेतकऱ्याच्या वेळेसच निर्णय चुकीचा घेतला हे निषेधार्ह आहे. हा सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे,” असे थोरात म्हणाले. त्याचबरोबर मंदिर उघडण्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. “कोरोनाचे संकट आहे. हे संपल पाहिजे. त्यामुळे इथे राजकारण करण्याची जागा नाही. जिथे लोक एकत्र येतात तिथे संसर्ग वाढतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील,” अस मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण
- महाराष्ट्राचे वीरपुत्र सचिन जाधव लडाखमध्ये शहीद!
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
- मराठा आंदोलन रोखण्यासाठीच मुंबईमध्ये जमावबंदी ; चंद्रकांत पाटलांचा आरोप
- संत तुकाराम नगर ते खराळवाडी मार्गावर पुणे मेट्रोची दुसरी चाचणी पार पडली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

