Share

नियमांचे उल्लंघन करत दुकाने सुरु ठेवणे पडले महागात!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर महापालिकेने गुरुवारी दंडात्मक कारवाई केली. दिवसभरात दहा आस्थापनांवर कारवाई करुन साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र हे निर्बंध लागू असतांना कोरोना नियमांचे उल्लंघन करत प्रशासनाच्या नजरेआड अनेक ठिकाणी दुकाने सुरु होती. मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून कोरोनाचा प्रसार सुरु होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. आत्तापर्यंत अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत.

या संदर्भात पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार टीव्ही सेंटर येथील रमेश खेडकर यांच्याकडून इलेक्ट्रिकचे दुकान सुरु ठेवल्याबद्दल दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. भगतसिंगनगर रोडवरील सागर जाधव यांनी कपड्याचे दुकान सुरु ठेवल्याबद्दल त्यांना पाच हजारांचा दंड करण्यात आला. टीव्ही सेंटर येथील कृष्णा पवार यांनी दुकान सुरु ठेवल्याबद्दल त्यांच्याकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेस्टेशन रोडवरील दिनेश तनवाणी यांच्याकडून पाच हजार रुपये, गुलमंडी येथील बालाजी अमुल भांडारकडून पाच हजार रुपये, चेलिपुरा येथील सरताज ट्रेडिंग कडून पाच हजार रुपये, जुना मोंढा येथील राजयोग ट्रेडर्सकडून पाच हजार रुपये, मणियार मार्केटकडून पाच हजार रुपये, चिकलठाणा रोडवरील रेणुका किराणा दुकानाकडून पाच हजार रुपये, गोमटेश मार्केट येथील बजाज कापड दुकानाकडून दहा हजार रुपये असा एकूण साठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथकाने केली. संचारबंदीच्या काळात दुकाने सुरु ठेवणे अनेकांना अशाप्रकारे महागात पडले आहे. अनेक दुकानांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!