बीड: राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला थांबवण्यासाठी सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजनांचे प्रयोग करून बघत आहे. प्रशासन धडपड करतंय पण तरी लोकं काही त्याला प्रतिसाद देत नाहीयेत. कोरोना नियंत्रणासाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी तसेच लॉकडाऊनही करण्यात आले आहे. मात्र नागरिकांकडून नियमांना पायदळी तुडवणं सुरूच आहे.
बीडमध्ये सध्या लॉकडाऊन आहे, या लॉकडाऊनमध्ये हॉटेल सुरू ठेवणे चार हॉटेलचालकांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत हॉटेलचालकांवर गुन्हे नोंद केले आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २४ मार्च पासून ते ४ एप्रिल असे दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. या काळात हॉटेल मधून केवळ पार्सल सुविधा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पण अनेक ठिकाणी काही हॉटेल्स सर्रास सुरु होते. अशा चार हॉटेलवर बीड ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाली परिसरात काही ठिकाणी हॉटेलांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली, तेव्हा त्या भागातील अनेक बार तसेच हॉटेल सुरु असल्याचे त्यांना दिसले तेव्हा या हॉटेलचालकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सावधान! औरंगाबादेत आता ‘या’ भागांमध्ये फिरण्यास असेल बंदी
- रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार; खासगी रुग्णालयांकडून लुटमार सुरूच
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे जनतेला महत्वाचे आवाहन !
- पद्मश्री फातिमा झकेरिया यांच्या निधनाने शहराचे मोठे नुकसान – खा. इम्तियाज जलील
- लातूर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, कोविड रुग्णांचे हाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

