बीड: वाढत्या कोरोना रुग्णांचा गैरफायदा घेणं सध्या अनेक रुग्णालयांमध्ये सुरु आहे, कोरोनावर रेमेडेसिवीर या इंजेक्शनसाठी रुग्णालयाकडून वाढीव किंमती आकरण्यात येत आहेत. रुग्णांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नाईलाजाचा हा असा गैफायदा खासगी रुग्णालये घेत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. इंजेक्शनची टंचाई आहे असे सांगत चढ्या दराने याची विक्री सध्या सुरु आहे. पोलीस आता यावर तपास करत कारवाई करणार असल्याची माहती अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग अधिक प्रमाणात झाल्यास ‘एचआरसीटी’च्या अहवालानुसार काही रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागते. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर सहापेक्षा जास्त इंजेक्शन द्यावे लागतात. सुरुवातीला या इंजेक्शनची किंमत चार हजाराच्या घरात होती, पण आता त्याची किंमत कमी करून नऊशे पर्यंत आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये तर हे इंजेक्शन मोफत देण्यात येते, परंतु खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना त्याचे पैसे मोजावे लागतात.
बीडमध्ये साधारण नऊशे रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात कृत्रिम टंचाई भासवून दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत विक्री केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या आहेत. पोलिस यावर लक्ष ठेवून असून असे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद केले जातील, असे अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे जनतेला महत्वाचे आवाहन !
- लातूर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, कोविड रुग्णांचे हाल
- मोठी बातमी : MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार !
- बच्चू कडूंची स्वयंपाक्याला झापड; ‘आता हाच न्याय राज्यातील त्रस्त जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा काय?’
- महाविकास आघाडीत कसलेले फलंदाज आहेत, जरा सांभाळून; मिटकरींचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

