बीड : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांच्या ऐवजी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान आज भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी पदाचा राजीनामा दिला. मुंडे यांना मंत्रिपद मिळावे ही त्यांची इच्छा नव्हती, तर जिल्ह्यातील अठरापगड जातींची ती इच्छा होती, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- काळजी घ्या ! पुण्यात आज नव्याने ३२० कोरोनाबाधित रुग्णांची झाली नोंद ,तर…
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

