🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील परिस्थिती भयानक आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. गृहमंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. दिल्लीत गंभीर प्रश्न असताना, आंदोलनं होत असताना, बस जळत असताना देशाचे जबाबदार व्यक्ती गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्यात एका बैठकीसाठी आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुळे म्हणाल्या, केंद्रातील सरकार कायम निवडणूक आणि प्रचारातच व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वात आधी दिल्लीतील हिंसाचार थांबला पाहिजे. आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि महाविद्यालयात घुसून मारहाण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आणि देशासाठी घातक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादावर विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांबद्दल आमच्या मनात सन्मान आहे. त्यामुळे ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊच नये. देशासमोर सध्या बेरोजगारी हा गंभीर विषय आहे त्यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206554096678797312?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206553852700311552?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
