मुंबई : सध्या शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. निवडणुकांपूर्वी पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे, जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात बैठक आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
तसेच पुढे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जुने शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या पडत्या काळात ते शिवसेनेसोबत होते. ते निष्ठांवंत आहेत. ते लवकरच परत येतील असं देखील राऊत म्हणालेत.मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. त्यातून काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील. याबाबत शरद पवार यांच्यासोबत देखील बोलणे झाले आहे, असं ते म्हणालेत.
दरम्यान, याआधी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याचीही माहिती होती. मात्र यानंतर आता आमदारांसोबतच ठाकरे सरकारमधील ३ मंत्री देखील नॅाट रिचेबल आहेत. यामध्ये संदीपान भूमरे (Sandipan Bhumare), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), शंभुराजे देसाई (Shambhuraje Desai) आणि स्वता एकनाथ शिंदे यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. हे सर्व आमदार आणि मंत्री हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या :


