Share

नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सीलारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम!

Published On: 

मुंबई : दिग्गज खेळाडू आणि नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सीलारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या पीटर सीलरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावे लागले. नेदरलँड्स आणि इंग्लंड (NED vs ENG) दरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, कर्णधार पीटर सीलरने पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले परंतु दुखापतीमुळे तो दुसरा एकदिवसीय सामना खेळू शकला नाही आणि सामना संपल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.

नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाने (KNCB) जारी केलेल्या निवेदनात पीटर सीलर म्हणाला, ”वर्ष २०२० पासून माझ्या पाठदुखीत सातत्याने वाढ होत आहे. म्हणूनच मी माझ्या देशासाठी यापुढे क्रिकेट खेळू शकणार नाही, हे खेदाने सांगतो.” ३४ वर्षीय पीटर सीलरने २००६मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दोन वर्षांनंतर, त्याने केनियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २००९ आणि २०१४च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सनेही इंग्लंडविरुद्ध दोन संस्मरणीय विजय मिळवले होते.

पीटर सीलरने ५७ एकदिवसीय आणि ७७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४७ धावा आणि टी-२० मध्ये ५९१ धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजी करताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५८ आणि वनडेत ५७ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या सामन्यात इंग्लंडने विक्रमी ४९८ धावा केल्या. नेदरलँड्ससाठी पीटर सीलरने या सामन्यात सर्वाधिक २ बळी घेतले आणि २५ धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!