🕒 1 min read
मुंबई : आज सामनामधील अग्रलेखाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्रांचा वर्षाव केला. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता राऊतांवर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना राणे म्हणाले की,’संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली आहे. काही लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून अमित शहा किमान काश्मीरला तरी जातात, संजय राऊत यांनी जाऊन तरी दाखवावे. यांचे राज्यात सरकार असून हे काय करत आहेत. तसेच आताचे राज्याचे उद्योगमंत्री जमिनी विकत आहेत’, असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. मुख्यमंत्री यांनी कर्तव्य काय हे त्यांनी आधी समजून घ्यावी जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे. अडीच वर्षे झाली तरी यांना एबीसीडी कळलेली नाही, असा आरोपही राणेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केला आहे.
दरम्यान, काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावला होता. तसेच काश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे. हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असं काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरणही त्यांनी दिले. तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्नही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल


