🕒 1 min read
पुणे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभा राहिले असल्याने धनंजय मुंडे यांना अभय मिळणार हे स्पष्ट झाले होते.
काल रेणू शर्मा यांनी आपली मागे घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, यावरून विरोधक व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी मुंडे यांना क्लीन चीट दिली नसल्याचे पहायला मिळतंय. रेणू शर्मा यांना न्याय मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील केली होती. धनंजय मुंडे यांचा बचाव केला जात आहे, म्हणून त्या आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या. रेणू यांनी मागे घेतलेल्या तक्रारीवरून तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र डागले आहे.
‘रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर तुम्हाला वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात. हा सत्तेचा माज व दबाव आणून केस मागे घ्यायला लावली हे निंदनीय आहे,’ असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे. ‘सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी मोठ्या हिंमतीने अत्याचाराची तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यास सुरुवात झाली,’ असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
‘रेणू शर्मा आणि तिच्या वकिलावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना देखील धमक्या देणे, ट्रोल करणे, असे प्रकार झाले. या दबावाखाली रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी लागली. त्यामुळे आता हा संदेश राज्यात जात आहे की, जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री तसेच सरकारमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला, तुम्ही जर हिंमतीने पोलीस ठाण्यात गेलात, तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. दबाव आणून, सत्तेचा माज दाखवून, तो प्रयत्न हाणून पाडू, असा संदेश दिला गेला आहे. असे म्हणत तृप्ती देसाई यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण… अजितदादांना राणेंचा टोला
- शरद पवार व अजितदादांवरील निष्ठा अढळ असल्याने भाजपची ऑफर धुडकावली; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
- ठाकरे सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना वेडयात काढले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
