Share

शरद पवार व अजितदादांवरील निष्ठा अढळ असल्याने भाजपची ऑफर धुडकावली; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Published On: 

कोरेगाव : तीन वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

ल्हासुर्णे येथील निवासस्थानी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाचा लेखाजोखा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला.

निवडणूकीसाठी शंभर कोटी लागले तरी खर्च करू. मंत्रीपद देऊन असेही सांगण्यात आले होते. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्यावरील निष्ठा अढळ असल्याने मी भाजपची ऑफर धुडकावली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या प्रमुख चेहरा भाजपमध्ये हवा, तुमच्या निवडणुकीसाठी 100 कोटी लागले, तरी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ती ऑफर होती परंतु राष्ट्रवादीवरील आणि पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यावरील निष्ठा अढळ असल्याने मी भाजपची ऑफर धुडकावली होती असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!