Share

देशभरातून ‘बीजेपी हेट फॅक्टरी’ बंद करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे-यशोमती ठाकुर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘न्यूजलाँड्री’ या वृत्तसंस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या द्वेषमूलक प्रचाराबाबतची धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून उघडकीस आणली आहे. त्यात भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या हिंदू इकोसिस्टीमविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. ‘टेक फॉग’ अॅपच्या माध्यमातून ‘हिंदू खतरे में है’ ही भावना सातत्याने ताजी ठेवून आक्रमक, हिंसक आणि द्वेषमूलक मजकूराचा प्रसार आणि प्रचार करणे तसेच अत्यंत सुनियोजित पद्धतीने सरकारसमर्थक असा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करुन प्रोपगंडा तयार करण्याचं काम या हिंदू इकोसिस्टीमच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं हा रिपोर्ट सांगतो. यावर काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे.

यशोमती ठाकूर ट्विट करत म्हणाल्या, ‘देशभरातून #BJPHateFactory बंद करायचं काम आपल्या सर्वांचं आहे. सोशल मिडीयाच्या गुन्हेगारी वापराचा पर्दाफ़ाश करणारी ही बातमी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आहे.’ यशोमती ठाकूर यांनी ‘टेक फॉग’ अॅपचा वापर कसा केला जातो, याबाबतचा एक व्हिडीओ रिपोर्टही ट्विट केला आहे.

काय आहे ‘टेक फॉग’ ?

‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे अ‍ॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या, @Aarthisharma08 या निनावी ट्विटर अकाउंटने केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील जनतेच्या धारणांमध्ये बदल घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने करण्यात आल्याचे म्हटले गेले. यावरच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ‘टेक फॉग’ अ‍ॅप बद्दल एका बातमीचा फोटो ट्वीट करत भाजपवर हा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!