🕒 1 min read
मुंबई: सध्या गाजत असलेले अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक सापडली बरोबर महिनाभरापूर्वी २५ फेब्रुवारीला हि घटना घडली आणि सिनेमा देखील लाजवेल अशा घडामोडी या प्रकरणात दररोज घडत आहेत. यामध्ये जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील याच घटनानांनी गाजले आणि सामन्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिले. यावरून दररोज माध्यमांमधून आपल्यावर बातम्यांचा भडीमार सुरू आहे. मात्र अद्याप देखील नवनवीन प्रकरण पुढे येत असून केवळ गुंतागुंत वाढत आहे. यावरून आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरामधून या सर्व आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले. असे सांगण्यात आले आहे. तसेच ‘अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले !’ असे यावेळी म्हटले आहे.
‘महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱया घडामोडी गेल्या दोन महिन्यांत घडत आहेत. जे राष्ट्र आपले चारित्र्य सांभाळण्याची दक्षता घेत नाही ते राष्ट्र जवळजवळ नामशेष झाल्यासारखेच आहे असे खुशाल समजावे. जे राष्ट्र सत्य, सचोटी, सरळपणा आणि न्यायनिष्ठा या सद्गुणांची किंमत जाणत नाही आणि त्या गुणांना मानत नाही ते राष्ट्र जिवंत राहण्यालादेखील पात्र नसते. विलासी वृत्ती हेच ज्या राष्ट्राचे दैवत आहे, ज्या राष्ट्रातील लोक केवळ स्वतःसाठीच जगतात किंवा जेथे एखादी छोटी व्यक्ती स्वतःला देव समजते त्या राष्ट्राचे दिवस भरत आले आहेत, असे खुशाल समजावे.
अनिल देशमुख, वाझे, परमबीर यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुनःपुन्हा अडकू नये. अधिकाऱ्यांनी सरकारला अडचणीत आणले. वाझे हा साधा फौजदार, रश्मी शुक्ला या ज्येष्ठ आयपीएस. परमबीर हे त्यापेक्षा ज्येष्ठ. अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे. आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमण्याचा पायंडा नव्याने पडला. हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले! सरकारने काय करावे हे सांगण्यासाठी हा प्रपंच नाही. सरकार निसरडय़ा टोकावरून घसरत आहे व नशिबाने वाचत आहे. या सर्व खेळात महाराष्ट्राला नक्की काय मिळाले? निदान महाराष्ट्राच्या चारित्र्यावर तरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये !’ अशी टीका आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरामधून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळय़ात आधी जावे लागेल’
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- ‘कोरोना झाला तर जगाला सांगायची काय गरज’ या क्रिकेटपटूचा सचिनला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
