🕒 1 min read
औरंगाबाद: महापालिकेचे आयुक्तच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असतांना राज्य शासनाने स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली आहे. स्मार्ट सिटीतून सुरू असलेल्या महापालिकेच्या कामावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आज (दि. ५) औरंगाबाद दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आस्तिक कुमार यांचाच पदभार पूर्ववत ठेवण्यात यावा यासाठी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे. ‘औरंगाबाद शहराची देशातल्या काही मोजक्याच शहरांपैकी स्मार्ट सिटी या प्रकल्पासाठी निवड झालेली आहे. स्मार्ट सिटीतील सध्या जवळपास ७८० कोटी रुपयाची विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कॉर्पोरेशेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योग्य नियोजन करत आहेत. शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आस्तिककुमार पांडेय अथक परिश्रम घेत आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पातून अजूनही बरीच नाविन्यपूर्ण योजनेची कामे हाती घ्यायची असून त्याचा कृती आराखडा सुध्दा तयार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून बाबासाहेब मनोहरे यांची औरंगाबाद शहराच्या स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी स्वतंत्रपणे निवड झाली आहे. त्यंच्या या निवडीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
- मुलीकडे एकटक पाहणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा
- पालकमंत्री देसाई म्हणाले, औरंगाबादची लवकरच कचरा शून्यतेकडे वाटचाल
- ‘सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेणार’
- महापालिका नोकरभरतीसाठी आयुक्त आग्रही, मुख्यमंत्र्याना केली विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
