औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी (दि.5) औरंगाबाद दौरा झाला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई,रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, माजी खाासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, शहरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यात शासन, प्रशासनाला यश आले आहे. लवकरच हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्र कार्यान्वित होणार आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहराची कचरा शून्यतेकडे वाटचाल होईल.
पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील गुंठेवारीचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावला आहे, यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करून पालकमंत्री म्हणाले, शहरासाठी 1680 कोटी रुपयांची राज्यातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना राबविण्यास सुरूवात केलेली आहे. शहरात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मनपाला पाठबळ दिलेले आहे. जिल्हा प्रशासनाचा उभारी उपक्रम नाविन्यपूर्ण असा आहे, सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, नागरिकांची त्याला संमती असेल, अशी कामे या जिल्ह्यात चांगले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून होत असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. तसेच औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासनाने कार्यवाही पार पाडावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी प्रशासनाला केल्या.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

