Share

‘सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेणार’

Published On: 

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी औरंगाबाद दौरा झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शहरातील विविध विषयांसह प्रलंबित असलेल्या सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचाही विषय निघाला होता. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद शहरातील सिडको प्रकल्पातील लीज होल्ड असलेल्या जमीन धारकांना बँकेत कर्ज घेताना अडचणी येतात, टीडीआर लोड करण्यासाठी, बेस एफएसआय 1.1 झाल्यामुळे सिडको क्षेत्रातील मालमत्तांच्याबाबत 0.1 एफएसआय संदर्भात आकारण्यात येणारे प्रीमियम शुल्क कमी करणे, 20 मीटर रस्त्याखालील निवासी तसेच वाणिज्य मालमत्तांना बेसरेटच्या 75 टक्के आणि 20 मीटर रस्त्यांवरील मालमत्तांना 100 टक्के प्रिमियम आकारणी करण्यात येते. प्रीमियम शुल्क मनपाप्रमाणे 35 टक्के असावा, अशा सिडको प्रकल्पातील जमीनधारकांच्या अडचणी आहेत.

दरम्यान, याच विषयावर गत महिन्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सिडको, नगर रचना आणि मनपा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचनाही केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!