मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण, अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. तर, ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे.
या नेत्यांनी मोदींकडे सविस्तरपणे राज्यातील सुमारे १२ मुद्दे मांडल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं. यात मराठा आरक्षण, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्न, तौक्ते चक्रीवादळ मदत आदी विषयांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील हे विषय गांभीर्याने ऐकले असून ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.
या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विषयांबाबत पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना या भेटीचे राजकीय संदर्भ काढायचे असतील त्यांनी काढावेत. केंद्र आणि राज्यात संघर्ष नसावा, राज्यांच्या संकटकाळात केंद्राने, पंतप्रधानांनी मदत करावी. राज्यात आणि केंद्रात सुसंवाद असावा ही राज्याची भूमिका आहे. चबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्वाचं आहे,’ असं भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींमुळे ‘त्या’ एकरकमी चेकचे ७ हजार कोटी वाचले; आता ठाकरेंनी गरजूंसाठी आर्थिक पॅकेज द्यावे’
- सकारात्मक! उस्मानाबाद जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ
- ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार भारताचा जावई, पहा कोण आहे ‘नवरी’
- मोदी मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त
- ‘शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी’, भाजपची मागणी

