Share

‘..तर मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनाला बसायला तयार’, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

Published On: 

मुंबई : मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्यावर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहीजे, अशी अपेक्षा मराठा समाजाची आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मराठा समाजाचा विरोधात निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे अनेक वेळा संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका न दाखवता, शांततेने राज्य सरकारच्या समोर मराठा आरक्षणाचे प्रश्न मांडले होते. पण राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षण संर्दभात सकारत्मक भूमिकेने पाहत नसल्याने, छत्रपती संभाजी राजेंनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

आरक्षण आणि अन्य प्रश्नावरून सरकार मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. राज्य सरकारने पाठविलेले पत्र अधिकाऱ्यांनी लिहिले असून मुख्यमंत्र्यानी देखील याची पुरेशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे समाजाने शांततेच्या मार्गाने के लेल्या आंदोलनाची सरकार दखल घेणार नसेल तर पुन्हा तीव्र आंदोलन करू ,असा इशारा खासदार संभाजी राजे यांनी दिला आहे. शासनातील अधिकारी मुख्यमंत्री आणि सरकारला अंधारात ठेवत असून सारथीला पुरेसा निधी दिला जात नसल्याचा गंभीर आरोपही राजे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

संभाजीराजे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या पत्रानुसार सरकारकडून मराठा समाजाच्या आंदोलनाकडे होणारे दुर्लक्ष पाहून कंटाळलो आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि समन्वयक यांना वेठीस धरण्याऐवजी समाजाने परवानगी दिल्यास मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनाला बसायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रातील एकूण १५ मुद्द्यांमध्ये ज्या निर्णयांबाबत माहिती दिली आहे, त्याने आपले मुळीच समाधानी झालेले नाहीये.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!