🕒 1 min read
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपूर्वी पिंपळेगुरव परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. असे असतांनाच पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून ११ वीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.’ तसेच राज्याचे मुख्यमंत्री घरी आहेत हे मान्य पण गृहमंत्री आहेत की नाही? वसूली करण्यापलीकडेही आपली कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना आहे काय?, असा सवालही भातखळकरांनी केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून ११वीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री घरी आहेत हे मान्य पण गृहमंत्री आहेत की नाही? वसूली करण्यापलीकडेही आपली कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना आहे काय? pic.twitter.com/mUYgGKsbe1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 23, 2021
दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव दशांत परदेशी असून तो १७ वर्षांचा होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल(२२ डिसें.) संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान दशांत घराबाहेर पडला. परंतु तो रात्रीपर्यंत घरी पोहोचलाच नाही, त्यामुळे दशांतच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. शोध सुरु असतांनाच एका बंद पडलेल्या कंपनीसमोर दशांत मृतावस्थेत आढळला. तद्पश्चात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
