Share

“इशान किशन आणि सूर्यकुमार टॉप क्लास खेळाडू”

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : “सूर्यकुमार यादव  आणि इशान किशन हे टॉप क्लास खेळाडू आहेत. मी सूर्यकुमारसोबत खूप वेळ घालवला आहे. तो अफलातून आहे. तसेच मी इशानला 2019 च्या आयपीएलमध्ये नेट्समध्ये सराव करताना पाहिलं होतं. तो स्विंग विरोधात खेळण्याचा प्रयत्न करतो. तो यात आता पारंगत झाला आहे. मी हे पाहून प्रभावित झालो आहे, असं म्हणत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सूर्या आणि इशान किशनचं कौतुक केलं आहे.

सूर्यकुमार आणि इशानने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात इशानने चमकदार कामगिरी केली. आपल्या पदार्पणात त्याने अर्धशतक झळकावलं. इशान डेब्यु मॅचमध्ये अशी कामगिरी करणारा अजिंक्य रहाणेनंतर दुसराच भारतीय ठरला. मात्र या सामन्यात सूर्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्याला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चौथ्या सामन्यात सूर्याला संधी मिळाली.

दरम्यान, भारताने शनिवारी इंग्लंडविरुद्ध ५ वा टी२० सामना ३६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेली टी२० मालिकाही ३-२ अशा फरकाने जिंकली. या सामन्यापूर्वी मालिकेत २-२ अशी बरोबरी होती. त्यामुळे ५ वा सामना निर्णायक होता. या निर्णायक सामन्यात विजय मिळवत भारताने सलग ६ वा टी२० मालिका विजय मिळवला आहे. या विजयानंतर मालिका विजयाची ट्रॉफी कर्णधार कोहलीने संघातील नवोदित खेळाडू सुर्यकुमार आणि इशान किशनकडे सोपवली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!