Share

विवेकचे आत्मबलिदान निश्चितच वाया जाऊ देणार नाही- विनोद पाटील

Published On: 

🕒 1 min read

बीड- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या पेचामुळे राज्यभर पडसाद उमटत आहेत. यातच एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये समोर आली. मराठा आरक्षणासाठी विवेक रहाडेने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल विवेकच्या कुटुंबियांची भेट घेतली.याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून माहिती दिली आहे. ते म्हणतात,विवेक रहाडेच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. जे झालं ते अतिशय वाईट होत, मी एक भाऊ म्हणून तुमच्या दुःखात सहभागी आहे. विवेकच आत्मबलिदान निश्चितच वाया जाऊ देणार नाही, आरक्षणाच्या या लढाईसाठी मी माझं सर्वस्व पणाला लावेल. परंतु माझ्या कोणत्याही भावाने आत्महत्येचं हे पाऊल उचलू नये, आपल्या घराचा विचार करावा. आपली लढाई आपण जिंकू, विश्वास ठेवावा.

दरम्यान, कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकतीच जिल्ह्यातील केतुरा येथे भेट देऊन आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या तरुणाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. नरेंद्र पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर आले असून या भेटीनंतर बोलताना त्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!