मुंबई : सुशांतसिंगच्या प्रकरणाला बराच काळ लोटला आहे. प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीसांकडून सिबीआय कडे गेली.आता सिबीआय या प्रकरणाचा तपास करत असताना प्रश्न असा उपस्थित होतो की मुंबई पोलिसांनी यात नेमकं काय साध्य केलं? कारण सिबीआय कडे केस जाण्याआधी मुंबई पोलिसांनी यावर महिनाभर चौकश्यांचे सत्र चालवले होते. अनेक उच्चभ्रूंंचे जाबजवाब घेतले गेले.
सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी आता त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या आसपास जरी फिरत असली तरी या प्रकरणात सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांंचा हात असल्याचे बोललं जात आहे.याविषयी आता माध्यमांंमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.आदित्य ठाकरेंवर आरोप होत असताना शिवसेना सातत्याने मराठी अस्मिता,मराठी माणूस आणि मुंबईचे मुद्दे पुढं का करु पाहत आहे? कंगणाचा मुद्दा ज्या पद्धतीने लांबवला ते बघता याविषयी शंका घेण्यास जागा आहे, आणि विशेष म्हणजे यावर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं नाही.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की, सरकारला माहिती आहे की यात आदित्य ठाकरे फसलेले आहेत आणि त्यांना सरकारमधील काही मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.मी माझ्या मुलाखतीत पन्नास वेळा सांगितले आहे की आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह प्रकरणात हात आहे.ते स्वतः यात अडकले असून त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
आतापर्यंत 50 दिवसांत या लोकांनी पुरावे बदलले असतील किंवा नष्ट केले असतील,अजून त्याची पुर्ण माहिती नाही, चौकशीनंतर सगळं बाहेर येईल.पण मला ज्या लोकांकडून काही गोष्टी कळल्या आहेत,त्यामध्ये आदित्य ठाकरे हे या बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यांमध्ये ते जात होते. दिशा सालियान आणि सुशांतसिंह या दोघांच्या घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांना शंभर टक्के पुर्ण माहिती आहे.पण हे सामूहिक पद्धतीने लपवलं जात आहे, दररोज शिवाजी पार्कमध्ये या लोकांच्या बैठका व चर्चा होतात, काय करायचं,कसं आदित्य ठाकरेंना वाचवायचं याबाबत तेथे चर्चा केली जाते. असाही आरोप राणे यांनी केला होता.
या आरोपांंबद्दल आदित्य ठाकरेंचं काय मत आहे? जर ते या प्रश्नांंना उत्तरं देणार नसतील तर हे आरोपांना आणखी बळ मिळेल. विरोधी पक्षांनी आणि विशेषतः भाजपने आदित्य ठाकरेंबद्दल आक्रमक भूमिका घेतली होती.जर खरंच आदित्य ठाकरे यांचा हात असेल तर ही महाराष्ट्रासाठी खूप गंभीर आणि धक्कादायक बाब असेल, तथापि त्यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेवर आणि आदित्य ठाकरेंवर आरोप होत असताना शिवसेना या मुद्द्यांवरुन पळ काढताना दिसत आहे.
मी सुद्धा एका माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा असुन मला चांगलं माहिती आहे की मुंबई पोलिसांवर कुणीच दबाव आणू शकत नाही पण सध्या मुंबई पोलीस मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावाखाली काम करत आहे आणि हे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचं आहे असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केला होता.
या सर्व आरोपांवरुन आदित्य ठाकरेंबरोबर मुख्यमंत्र्यांच्याही प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरंच मुंबई पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश येत होते का? या आरोपांचं उत्तर यायला हवं.तसंही मुंबई पोलिसांना या प्रकरणात काही विशेष हाती लागलेलं नाही. एनसीबी आणि सिबीआयने आज रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. पुढील चौकशीत अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या :
पासवानांचा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास नकार, एनडीएत फुट पडण्याची शक्यता
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची कोरोनावर मात
अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

