पिंपरी-चिंचवड : गेले ५ महिने पुणे, मुंबईसह राज्यात कोरोनाने कहर माजवला आहे. यातच अनेक लोकप्राधिनिधींसह बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनाने विळखा घातल्याचे समोर आले आहे. तर, अनेक राजकीय नेत्यांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.
२७ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.यानंतर त्यांना घरीच विलग्नवासात राहायचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आज, नाना काटे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याचे पत्रकारांना त्यांनी कळवले आहे.
दरम्यान, नाना काटे यांचा कार्यकाळ नुकताच संपल्याने काल नव्या विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना शह देण्यासाठी त्यांचे खास मित्र असलेल्या राजू मिसाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. खुद्द अजित पवार व पार्थ पवार यांनी मिसाळ यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या:-
पासवानांचा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास नकार, एनडीएत फुट पडण्याची शक्यता
राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेची देवेंद्र फडणवीसांनी काढली लक्तरे
ओरडून बोलल्याने कोरोना होतो, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर घणाघात
..तर मुंबई कायमची सोडून जाईन; कंगनाचे गृहमंत्र्यांना थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

