मुंबई : व्यावसायिक अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.काही दिवसांनी याची कार्यवाही सुरू करण्यात येईल.व्यावसायिक अन्वय नाईक यांनी पत्रकार अर्नब गोस्वामी संपादक असलेल्या रिपब्लिक भारत या चँनलच्या ईमारतीचे बांधकाम केले होते. त्याचे पैसे त्यांना मिळाले नाही म्हणून त्यांच्यात आणि रिपब्लिक भारतमध्ये वाद झाले होते. अन्वय नाईकांच्या मृत्यू नंतर अर्णब गोस्वामी दोषी असल्याचे पुरावेही सापडले होते.अशी प्राथमिक माहिती या प्रकरणाची सध्या समोर आलेली आहे.आता या प्रकरणात नवीन चौकशी सुरू होणार असल्याने अन्वय नाईक यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा जनता करत आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
‘अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत’ अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अस घटना म्हणते.
अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?’ असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय, राजेश टोपेंचा घणाघात
आम्ही रात्रीची कामे दिवसा करतो, उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी
..तर मुंबई कायमची सोडून जाईन; कंगनाचे गृहमंत्र्यांना थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

