मुंबई- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर युरोप खंडात बऱ्याच देशांनी नवीन उपाय लागू केले आहेत. ऑस्ट्रियामध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मंगळवारपासून अंमलात येणार आहे आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.
पोर्तुगालनेही काल टाळेबंदीच्या नव्या उपायांची घोषणा केली आहे. दोन आठवड्यांच्या कालावधीत या उपायांचा आढावा घेतला जाईल. शुक्रवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही नोव्हेंबर अखेरपर्यंत दुसरी राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर केली आहे.
भारतात सक्रीय रुग्णांचा दर सातत्याने कमी होत असल्याची नोंद होत आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर ,सतत तिसऱ्या दिवशी, सक्रीय रुग्ण संख्या सहा लाखांपेक्षा कमी आढळुन आली असून सातत्याने ती कमीच होत आहे.सध्या भारतात सक्रीय रुग्णांची संख्या 5,70,458 आहे.देशातील सक्रीय रुग्ण दर कमी होत असून तो आता 6.97% इतका आहे, त्यात सातत्याने घट होताना दिसत आहे.
हे सातत्य राखण्याची कार्यक्षमता, राज्य/केंद्रशासित प्रदेश यांच्या सहयोगामुळे साध्य झाली असून, केंद्रसरकारच्या एकात्मिक चाचणी करणे,वेळेवर रुग्ण ओळखणे, त्वरीत रुग्णालयात दाखल करणे आणि सर्व सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालये आणि घरगुती विलगीकरण यात आदर्श मानक उपचार पध्दती सुनिश्चित केल्याने शक्य झाले आहे असं आरोग्य विभागाने कळविले आहे .
दरम्यान, ‘सध्या युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकतो आहोत. साहजिकच आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे’, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
‘दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं. सरकारने घालून दिलेले नियम-अटी महत्त्वाच्या आहेत. मास्क वापरणं गरजेचं आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे’, असं टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला !
- रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी,चिराग पासवान यांच्या भूमिकेबद्दल संशय
- जाणून घ्या देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने का होतेय घट?
- मर्यादा ५० नाही ५०० करा; मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट आणि केटरर्स असोसिएशनचे आंदोलन
- मथुरेतील नंदबाबा मंदिरात परवानगी न घेता नमाज पठण ; फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

