Share

“काँग्रेस शरियाच्या दिशेने जातोय का?”, अतुल भातखळकरांचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०११ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेल्या धनबाद शहरातील पक्ष कार्यालयाचे कुलूप सोमवारी(१४ जाने.) काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटाने तोडले. धनबाद जिल्ह्याचे पक्ष प्रभारी आणि आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता अधिकृत बैठक घेण्यासाठी सर्किट हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, काही काँग्रेस नेते कार्यकर्त्यांसह लुबी सर्कुलर रोडवरील पक्ष कार्यालयात पोहोचले आणि सील तोडून इमारतीत प्रवेश केला. दरम्यान, या घटनेवरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘काँग्रेस पक्ष शरियाच्या दिशेने जातोय का? झारखंडमधील धनबाद येथील पक्ष कार्यालयाचे उच्च न्यायालयाने लावलेले टाळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसचा या देशातील न्यायव्यवस्थेवर अजिबात विश्वास उरलेला दिसत नाही’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत गुप्ता यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पक्ष न्यायालयाच्या आदेशांचा खूप आदर करतो. मी आदेश वाचल्यानंतरच (पक्ष कार्यालय सील करण्याबाबत) योग्य टिप्पणी करेन.’ लोकांच्या भावना आणि कायदा-दोन्हींचा समान आदर केला पाहिजे, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे काँग्रेसचे धनबाद जिल्हाध्यक्ष ब्रजेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, त्यांना या घटनेची कोणतीही माहिती नाही. तसेच जिल्हा मंडळाचे अध्यक्ष रॉबिन गोराई यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!