Share

“भ्रष्टाचाराचे शेण खाल्ल्यावर हे नशिबी येतेच”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Shiv Sena MP Rajendra Gavit) यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र ते चेक बाऊन्स झाल्याने त्यांच्यावर न्यायालयात खासगी दावा करण्यात आला होता. यावरच न्यायालयाने त्यांना एक वर्ष कारावास आणि १ कोटी ७५ लाख रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“हा महाराष्ट्रावर अन्याय आहे काय? भ्रष्टाचाराचे शेण खाल्ल्यावर हे नशिबी येतेच.जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीबद्दल शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना १ वर्षाचा तुरुंगवास आणि १.७५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. “, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनाप्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तर आता शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनाही एक वर्षाचा कारावास दिला आहे. त्यामुळे भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला निशाण्यावर धरले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!