Share

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या परीक्षांच्या बाबतीत पवारांनी केलेला दावा खोटा ?

Published On: 

मुंबई – राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा घेण्याचे संकेत दिले होते. सरकार व राज्यपालांच्या भूमिकेतील विरोधाभासामुळे राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार की घेतल्या जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. यावेळी दापोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला हाणला.

पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला तर देशातील नामांकित विद्यापीठे, तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील तर शासनाने घेतलेला निर्णय त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे असं होत नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते, असा टोला शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

‘जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. हे शरद पवारांना माहिती नाही असं होऊच शकत नाही. मग आपल्या सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय झाकण्यासाठी राज्यपालांसारख्या घटनात्मक पदावरच्या व्यक्तींवर टीका करणे हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पटण्यासारखे नाही,’ अशी टीका भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. तावडे यांनी केलेल्त्याया टीकेमुळे पवारांनी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?

महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे शरद पवारांनी मान्य केलं, चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

पहा, असं का म्हणाला सोनू सूद? ‘Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो’  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!