मुंबई : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी आणि नेते मंडळी सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मजुरांचे हाल होत आहेत. परराज्यातील लोक आपल्या घरी जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा वापर करतायत. शा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना तो त्यांच्या गावी नेऊन सोडत आहे.
दरम्यान, एका नेटकऱ्याने सोनू सूदला एका विचित्र विनंती केली. त्याने ट्विट केले आहे कि, ‘“लडाखमध्ये चीनचे सैनिक तैनात आहेत, त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवा.” यावर सोनूने देखील गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला "“त्या चीनी लोकांना माझ्या डिटेल्स पाठवा.”
Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो ???????????????????? https://t.co/66huPWsRaL
— sonu sood (@SonuSood) June 9, 2020
करोना विषाणूमुळे सध्या भारत आणि चीनमध्ये काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोनू सूदचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही महिण्यापासूनच सोनूने सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.तसेच त्याने पुढे केलेल्या या मदतीच्या हातावरून राजकीय वर्तुळात राजकारण झालेले देखील पाहायला मिळाले.
अटींसह लॉकडाऊन मध्ये असलेली शिथिलता म्हणजे मोकळीक नाही – बाळासाहेब थोरात
पुनश्च हरिओम : राजकारणातील ‘हा’ धुरंधर बाहुबली नेता होणार राष्ट्रीय राजकारणात सक्रीय
छोटा भीमने चुटकीला सोडून राजकुमारी इंदुमतीशी केले लग्न?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

