Share

जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का?- नितीन चौगुले

Published On: 

मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. असे असतानाच सांगलीमध्ये आज समीर यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढल्याचे दिसून आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी असणाऱ्या नितीन चौगुले यांनी संस्थेची बाजू मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध आहेत क? याची मागणी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’नवाब मलिकांसारखे जबाबदार मंत्री समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. त्यांच्यावर राजकीय आरोप केले तर समजू शकतो पण त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत.’ तसेच बाळासाहेब ठाकरे हे मराठी कलाकार, खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असत. आम्हाला मुख्यमंत्री उद्धवजींकडून अपेक्षा आहे की ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्याला ताबडतोब मंत्रीमंडळामधून काढून टाकावे. सरकारी कामात, तपासात हस्तक्षेप केल्याबद्दल कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतोय,’ असेही चौगुले म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’नवाब मलिक यांच्यासारखे मंत्र्यांच्या खात्याचा हा विषय नाही. असे असले तरी ते रोज उठून एखादी पत्रकार परिषद घेतात आणि त्यामधून उठसूट आरोप करतात. या माध्यमातून तपास भरकटवून ड्रग्ज माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला संशय आहे की त्यांचे जावई ज्या पदार्थाने अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये सापडले. त्याप्रमाणे नवाब मलिक सुद्धा या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत की त्यांचे काही लागेबांधे आहेत की काय याचा तपास महाराष्ट्र शासनाने करावा असं मी आवाहन करतो.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!