Share

‘मंत्री संजय राठोड गायब का?’, तृप्ती देसाईंची पूजा चव्हाणच्या घरी भेट

Published On: 

🕒 1 min read

बीड : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुजा चव्हाणच्या परळीच्या वसंतनगर तांड्यावरील घरी भेट दिली. पूजाच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

पुजा चव्हाणच्या आत्महत्येला दोन आठवडे झाले तरी अजून गुन्हा दाखल झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी दोघांना अटक केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील वसंतनगर तांड्यावरील पुजा चव्हाण हिच्या घरी शनिवारी तृप्ती देसाई भेट दिली. पूजाचे वडील लहू चव्हाण यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की, पुजाला न्याय मिळाला पाहिजे. राज्याचा मंत्री असा एवढे दिवस गायब कसा होवू शकतो. पुजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. पुजाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. पुजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी लढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!