Share

किरीट सोमय्या आतंकवादी आहे का? ही दंडुकेशाही चालणार नाही; चंद्रकांतदादा आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येत आहेत. सोमय्या यांनी घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुरू आहे. यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत.

आपला दौरा जाहीर केल्यानंतर काही वेळातच किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिल्याचा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केलाय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान यावर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर बोलताना किरीट सोमय्या आतंकवादी आहे का? असा सवाल ठाकरे सरकला केला आहे.

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे. किरीट सोमय्या आतंकवादी आहे का? या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत. मुंबईत घातपात करण्यासाठी आतंकवादी काम करत आहेत त्यांना पकडायचे सोडून किरीट सोमय्यांच्या पाठीमागे हे सरकार लागले आहे.

ही दंडुकेशाही चालणार नाही. एकेकाळी बिहारमध्ये अशी परिस्थिती होती तिकडे आता सुधारणा झाली पण दुर्दैवाने तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत असल्याचे पहायला मिळत आहे. सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ?’ असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यावेळी ठाकरे सरकारला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!