Share

पोलीस आयुक्त गुप्ता सर, जाधववाडी शहराच्या बाहेर आहे का ?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सध्या कोरोनाचे रुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहे. प्रशासन आप-आपल्या परीने उपाय योजना राबवत आहे. परंतु या उपाय योजनेला सध्या हरताळ फासले जात असल्याचे चित्र जाधववाडी मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे १४ मार्च पर्यंत जमावबंदी वाढवण्यात आलेली आहे. परंतु हि जमावबंदी जाधववाडीला लागू नाही का ? असा सवाल नागरिक करत आहे.

शहरात कोरोनाने गेल्या काही दिवसात थैमान घातले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. काही नागरिक कोरोना गंभीरतेने घेत नसल्याने शहरात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील जाधववाडी भागात भरणाऱ्या भाजी मंडई मुळे अक्षरशः गर्दीचे लोंढे दिसत आहे. पोलीस यंत्रणा आपल्यापरीने गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, शहरात लागू असलेल्या जमावबंदीचा आदेश जाधववाडी मध्ये लागू आहे का असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्या पासून पुन्हा रुग्णांनी शंभरी गाठण्यास सुरुवात केली. १९  रोजी १४३, २० रोजी १२६, २१ रोजी १८४, २२ रोजी १०४, २३ रोजी २१९, २४ रोजी २८१, २५ रोजी २७५, २६ रोजी २४७, २७ रोजी २९७, २८ रोजी २५६, १ मार्च रोजी २२५ तर काल ३२५ बाधित रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे. मात्र, मागच्या वर्षाच्या तुलनेत काही नागरिकात जास्त गंभीरता दिसून येत नाही, त्यामुळे नियम पाळण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!