मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाई केली जात आहे. यावरून संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला सडेतोड उत्तर दिल आहे. ‘या सगळ्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल’, असा इशाराच संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून तपास मागे लावून लोकांना त्रास देण्याचं काम देशात सुरू असल्याचं म्हंटले होते. या वक्तव्याला पाठिंबा देत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, राजकीय सुडातून छळ आमच्या लोकांचा छळ केला जात आहे. आरोप करून फरार झालेल्या व्यक्तीमुळे माजी गृहमंत्री तुरूंगात आहेत असं म्हणत भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून, दबाव निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आता आम्ही घाबरत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा बेसुमार गैरवापर सुरू आहे. पापी लोक, बुरखे घालून फिरताय असं म्हणत त्यांनी जो त्रास आम्ही भोगला, याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. नियती कोणालाही माफी करत नाही. तुम्हाला काय आम्हीच दिसतो का? तुमचं सगळं चमचा मंडळ धुतल्या तांदळाचं आहे काय?’, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आधी तक्रारींचे निराकरण मगच नियुक्त्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक


