🕒 1 min read
बंगळुरू : IPL 2022 च्या ऑक्शनमध्ये कृणाल पंड्याला लखनऊ सुपर जायंट्सने संघाने ८.२५ कोटीमध्ये खरेदी केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज , गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जने सुरुवातीलाच अष्टपैलू खेळाडूसाठी मोठी बोली लावत होते. मात्र लखनऊ सुपर जायंट्सने यात बाजी जिंकली आहे. विशेष म्हणजे ज्या हुड्डासोबत कृणालचा मोठा वाद होता त्याच्यासोबत कृणाल पंड्या पुन्हा खेळणार आहे.
कृणाल पंड्याने त्याची बेस प्राईस २ कोटी ठेवली होती. गेल्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचा भाग होता पंड्याने मुंबई इंडियन्समधून आयपीएल २०१६ मध्ये पदार्पण केले होते . कृणाल पुन्हा मुंबई सारखा हार्दिकसह गुजरात मध्ये खेळेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र गुजरातने त्याच्यासाठी जास्त बोली लावली नाही.
मागील हंगामात कृणाल पांड्याने १३ सामन्यात१४३ धावा केल्या होत्या. सोबतच ५ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईने कृणालला रिटेन केले नव्हते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८४ सामने खेळले असून ११४३ धावा आणि ५१ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अरविंद केजरीवाल आजपासून पंजाब दौऱ्यावर
- हिमंता बिस्वा शर्मांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना चांगल्या उपचाराची गरज- नाना पटोले
- “ना आमचे सरकार पडणार, ना मी झुकणार, जय महाराष्ट्र!”; संजय राऊतांचे खोचक ट्वीट
- IPL Auction 2022 : ईशान किशनसाठी मुंबईने पार केली “लक्ष्मी” रेखा
- IPL 2022 Auction: शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने ८.५ कोटींत केले खरेदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
