Share

IPL Auction 2022 : ईशान किशनसाठी मुंबईने पार केली “लक्ष्मी” रेखा

Published On: 

बंगळुरू : बंगळुरू येथे सुरू असलेल्या आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनवर मोठी बोली लावण्यात आली आहे. ईशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने एका खेळाडूवर १० कोटींहून अधिक बोली लावली आहे.

ईशान किशन २०१८ मध्ये ६.४० कोटींना मुंबईला विकला गेला होता. ईशानने मुंबईसाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.२०२० मध्ये, ईशानने आयपीएलमध्ये ३० सिक्सर मारले होते, जे त्या हंगामात एका फलंदाजाने मारलेले सर्वाधिक सिक्सर होते. मेगा ऑक्शनमध्ये सध्या तो सर्वाधिक महागड्या खेळाडू बनला आहे. युवराजसिंग (१६ कोटी) नंतर ईशान आयपीएल इतिहासातला दुसरा महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

IPL 2021 मध्ये,ईशान किशनने १० सामन्यांमध्ये २४१ धावा केल्या होत्या, ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने इशान किशनला रिटेन केले होते. ऋषभ पंत जरी सध्या भारतासाठी कीपरअसला तरी, ईशान किशन नेहमीच एकदिवसीय आणि टी २० मध्ये दुय्यम यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवतो. मुंबई इंडियन्स ईशानला दिलखुलास खर्च करत पुन्हा खरेदी केला. ईशानकडे मुंबई भावी कर्णधार म्हणून बघत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!