चंदीगड : भारतीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात नवीन विधानसभेसाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणूका होणार आहेत. तर या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. देशातील सर्वच राजकीय पंडितांचे लक्ष उत्तरप्रदेश कडे लागले असले तरी पंजाब राज्यात पण अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पंजाब राज्यात विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या दोन प्रमुख पक्षातच खरी स्पर्धा असणार आहे. आम आदमी पक्षाने भगवंत मान यांना पंजाब राज्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाने पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतली आहे. पंजाब निवडणुकीकरता आम आदमी पक्ष मोठ्या आक्रमकतेने प्रचारात उतरला आहे. पंजाब निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आजपासून आठवडाभर प्रचाराकरता पंजाबच्या विविध भागात मुक्काम ठोकून असणार आहेत.
पंजाब काँग्रेस मध्ये नवजोत सिंग सिद्धू आणि मुखमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यात वाद रंगला असतानाच, आम आदमी पक्षाने पंजाब राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.गोवा राज्यातील विधानसभेचा प्रचार संपवून अरविंद केजरीवाल पंजाब राज्यात पोहचले आहेत. आठवडाभर ते पंजाबमध्ये तळ ठोकणार आहेत. अरविंद केजरीवाल हे जालंधर,अमृतसर, मोहालीसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी फिरणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगी पण आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत. पंजाब राज्यात विधानसभेसाठी ११७ जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १६ व्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- हिमंता बिस्वा शर्मांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना चांगल्या उपचाराची गरज- नाना पटोले
- “ना आमचे सरकार पडणार, ना मी झुकणार, जय महाराष्ट्र!”; संजय राऊतांचे खोचक ट्वीट
- IPL Auction 2022 : ईशान किशनसाठी मुंबईने पार केली “लक्ष्मी” रेखा
- राहुल बजाज यांचे निधन
- IPL 2022 Auction: शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने ८.५ कोटींत केले खरेदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

