🕒 1 min read
बंगळूरू: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, ज्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती, त्याला मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपयांत खरेदी केले आहे. (Jofra Archer will play for Mumbai) आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये चुरस दिसून आली. मात्र मुंबईने बाजी मारली. दरम्यान मुंबईने जोफ्राला खरेदी करत त्यांचा गोलंदाजी स्क्वाड मजबूत केला आहे. मुंबई इंडियन्स कडे आधीच जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज आहे. त्यामुळे जोफ्रा आणि जसप्रीत बुमराह यांची जोडी २०२३च्या हंगामापासून फलंदाजांचे घाम सोडवणार आहे.
दरम्यान त्याच्यावर झालेल्या कोपर शस्त्रक्रियेमुळे तो यंदा स्पर्धेत खेळणार नाहीये. आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी फ्रँचायझींना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, आर्चरची नोंदणी प्रामुख्याने २०२३ आणि २०२४ मध्ये संभाव्य सहभागाच्या दृष्टीकोनातून करण्यात आली होती, कारण त्याच्या सध्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही.
मात्र अशातही त्याच्यावर मुंबईने ८ कोटींची बोली लावत त्याला खरेदी केले आहे. दरम्यान यंदा मुंबईने १९ वर्षीय एन तिलक वर्मावर विश्वास दाखवला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद राज्याकडून खेळणाऱ्या या डावखुऱ्या खेळाडूने तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक शैलीत फलंदाजी करताना जबरदस्त खेळ दाखवला होता. तो त्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. यावर्षी आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात तिलक वर्माला (Tilak Verma was bought by Mumbai Indians for 1 crore 70 lakhs) मुंबई इंडियन्सने त्याला १ कोटी ७० लाखांत खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Auction 2022 : १९ वर्षीय खेळाडूवर मुंबईचा करोडोचा ‘तिलक’
- IPL AUCTION 2022: दिल्लीच्या संघात पुन्हा एक वर्ल्डकप विनींग कर्णधार
- किरीट सोमय्यांचा सत्कार केल्या प्रकरणी ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल
- ‘…तर आघाडी करण्यास हरकत नाही’; एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
- गेल्या ५ वर्षात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिप्पट श्रीमंत; संपत्तीत इतक्या कोटीने वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
