Share

IPL 2022 : भारतीय संघाला दुखापतीचं टेन्शन! प्रमुख ५ खेळाडू आयपीएलमधुन बाहेर

Published On: 

मुंबई : भारतीय संघाची टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी चालू आहे. पण भारतीय संघासमोर मोठे टेंन्शन उभे राहू शकते. आयपीएल मध्ये काही खेळाडू जखमी झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे प्रमुख ५ खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे टेंन्शन जास्त वाढले आहे.

चेन्नईने दीपक चाहर १४ कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. पण आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरु होण्याआधीच त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आयपीएल (IPL)खेळू शकला नाही. आता तो टी २० विश्वचषकापर्यंत देखील खेळू शकणार की नाही. अशी शंका उपस्थित झाली आहे.

६ मे रोजी गुजरात टायटन्स विरुध्द मुंबई इंडियन्स सामन्यात सूर्यकुमार यादवलाही दुखापत झाली आहे. त्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर पडला. आता सूर्यकुमारला टी२० विश्वचषकामध्ये संधी मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

दुखापत झाल्यामुळे रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन हे तिघे देखील आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. या खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते. पण प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे रोहीतचही शर्मांच टेंन्शन वाढल आहे.

महत्वाच्या बातम्या : 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!