मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. सोनाली कुलकर्णी आता परत एकदा लग्नबंधनात अडकली आहे. सानालीने तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली.
अभिनेत्रीने आत्ताच इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णीने एक फोटो पोस्ट केली आहे. फोटोला खूप हटके कॅप्शन दिले आहे. यात सोनाली आणि कुणाल अस लिहिलं आहे. त्याचबरोबर अखेर आम्ही केलं, हे देखील लिहिले आहे.
सोनालीची इंस्टाग्राम पोस्ट-
कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे आम्हाला आमचे लग्न तीन वेळा कॅन्सल करावे लागले आहे. आम्ही कोरोना काळात दुबईमध्ये अडकलो होतो. दुबईत अडकल्यामुळे रजिस्टर लग्न करू अस ठरवलं. आमच्या आई वडिलांना, कुटुंबियांना प्रवास करता येत नसल्यामुळे त्यांनी झूम कॉल वरून आमच्या लग्नात हजेरी लावली. आणि २०२१ साली ७ मे रोजी आम्ही लग्न बंधनात अडकलो.
आम्ही कोर्टामध्ये लग्न केलं. ठरवलं की, कोरोना परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि सेलिब्रेट करू. आता आम्ही आमच्या वेडिंग अॅनिव्हरसरीला ठरवल्याप्रमाणे एकत्र आलो आणि मराठमोळ्यापद्धतीने लग्न केलं. लग्न कुठे केलं, कस झालं, सगळं लवकर शेअर करू. “तुमचा आशीर्वाद आणि प्रेम नेहमी राहू द्या,” असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

