Share

महेश बाबूच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई; बॉक्सऑफिसवर धमाका!

Published On: 

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबू यांच्या सिनेमाने जोरदार एन्ट्री केली आहे. महेश बाबूच्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर एकदम राडा केला आहे. सिनेमाने ओपनिंगच्या दिवशी तब्बल ३६.०१ कोटी रुपयांचचे कलेक्शन केले आहे. महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटी’ या चित्रपटाची सर्व लोकांना खूप दिवसांपासून उत्स्कुता होती. आता या सिनेमाचं जोरदार स्वागत होत आहे.

‘सरकारू वारी पाटी’ हा सिनेमा १२ मे रोजी रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षक वर्गाने भरभरून प्रेम दिले आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने जबरदस्त कमाई करून दाखवली आहे. दरम्यान देशातील कमाईचा आकडा हा ५० कोटी रुपये इतका झाला आहे. ही कमाई येणाऱ्या काळामध्ये सुरु राहते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महेश बाबूचा सिनेमा युएस मध्ये देखील चालत आहेत. युएसमध्ये ११ मे ला महेश बाबू याचा ‘सरकारू वारी पाटी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. युएसमध्ये देखील या सिनेमाने बॉक्सऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. महेश बाबू यांचा कमबॅक जबरदस्त झाला आहे, हे त्याच्या कमाईच्या आकड्यावरून समजत आहे.

महेश बाबूचे चाहते फक्त साऊथ मध्येच नाहीत तर, उत्तर भारतात देखील प्रचंड चाहते आहेत. अनेक प्रेक्षकांना महेश बाबू यांनी हिंदी चित्रपटामध्ये यावे, अशी इच्छा आहे. पण बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या संदर्भात महेश बाबू यांनी मोठ वक्त्यव्य केल होतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!