Share

काश्मिरी पंडितानंतर आता पोलीस शिपायाची हत्या, काश्मिरात हत्याकांड सुरूच!

Published On: 

जम्मू : जम्मू काश्मिरमधील बडगाम या जिल्ह्यात काश्मिरी पंडित असलेला तरुण राहुल भट्ट याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. राहुल भट्टच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. ही ताजी घटना असतानाच अजून एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. आज एका पोलिस कॉन्स्टेबलची त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

बडगाम जिल्ह्यातील तहसीलच्या सरकारी कार्यालयात काम करणारे राहुल भट्ट याची हत्या करण्यात आली होती. थेट सरकारी कार्यालयात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी आणखी एक हत्या घडवल्यामुळे खळबळ माजली आहे. रियाद अहमद ठोकेर असं हत्या झालेल्या या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव आहे. पुलवामा जिल्ह्यातील गुडरू येथे ते राहत होते. काही दहशतवादी ठोकेर यांच्या घरात घुसले. त्यांनी त्यांच्यात छाती आणि डोक्यात गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी सदर भागात गस्त घातलली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. बडगाम जिल्ह्यातील चडूरा शहरात असलेल्या तहसील कार्यालयात घुसून राहुल भट्ट या पंडिताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान त्यावेळी तहसील कार्यालयात १०० पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते, पण फक्त राहुल भट्ट यांनाच गोळी कशी मारली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनांची चौकशी व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!