मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ चांगल्या लयीत आहे. उत्तम वेगवान गोलंदाजांचा संघ म्हणून हैदराबादला ओळखले जाते. आता या संघात अजून एका गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने दुखापतग्रस्त सौरभ दुबेच्या जागी सुशांत सिंगचा आपल्या संघात समावेश केला आहे.
२० लाखांच्या मूळ किमतीत सुशांत हैदराबादचा सदस्य बनला आहे. सौरभ दुबेला पाठीला दुखापत झाली आहे. त्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला सुशांत हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यात पटाईत आहे.
#OrangeArmy, say hello to Sushant Mishra.
The 21-year-old left-arm pacer joins us as a replacement for Saurabh Dubey who has unfortunately picked up an injury that rules him out for this season.
Wish you a speedy recovery Saurabh. ????#ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/q6hQIYmFm2
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 4, 2022
२१ वर्षीय सुशांत हा रांचीचा खेळाडू आहे. त्याने चार प्रथम श्रेणी सामने खेळले असून १३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२२मध्ये हैदराबादची कामगिरी चांगली झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या पराभवानंतर या संघाने शानदार पुनरागमन करत सलग पाच सामने जिंकले. मात्र, त्यानंतर हैदराबादने सलग दोन सामने गमावले. हैदराबाद संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
Srh new recruit Sushant Mishra.#IPL2022 #SRHpic.twitter.com/34C44Q7B3M
— Jatin (@Jatin1251) May 4, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

