Share

“बाळासाहेबांची कॉपी करणं सोप्पं काम नाही,” ; आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत, राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी राज ठाकरे यांचा सत्कार भगवी शाल घालून करण्यात येत आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. राज यांचा ५ जूनला अयोध्या दौरा ही नियोजित आहे. यामुळे राज ठाकरे यांची तुलना बाळासाहेब ठाकरे यांच्याशी केली जात आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावली जाते, त्याचप्रमाणे मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंना हिंदुजननायक अशी उपाधी देण्यात आली आहे. आता यावर केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची कॉपी करू शकतं नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं. बाळासाहेबांनी भोंगे काढा अशी आक्रमक भूमिका कधी घेतली नव्हती. बाळासाहेबांनी वेळोवेळी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता. याची अनके उदाहरणे आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा फक्त आतंकवादी मुस्लिमांना विरोध होता. त्यामुळे बाळासाहेबांची कॉपी करण एवढं सोप्प काम नाहीये,” अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना आपल्या वेगळ्याच शैलीत टोला लगावला आहे.

रामदास आठवलेंनी आपल्या खुमासदार शैलीत राज ठाकरे यांना टोला लगावला, यावर मनसेकडून अजून कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही. पण यामुळे रामदास आठवले आणि मनसेमध्ये वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. आता मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!