Share

BANK खाते धारकांसाठी महत्वाची बातमी! आता कामे लवकर होणार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बँक खाते धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता देशातील बँका एक तास आधी सुरू होणार आहेत. 10 ऐवजी आता 9 वाजता बँका खुल्या राहणार आहेत. यामुळे बँक खाते धारकांना आपली कामे करवून घेण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. आरबीआय (RBI) ने हा निर्णय घेतला आहे.

बँकांचा वेळ वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे बँकांचा वेळ कमी करण्यात आला होता. आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे पुन्हा आरबीआयने बँकांचा वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहार करण्यासाठी अधिकचा एक तास ग्राहकांना मिळणार आहे. पण बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोमवारपासून सकाळी ९ वाजता बँका सुरू होतील अशी माहिती आहे.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये RBI ने 7 एप्रिल रोजी बाजाराच्या व्यापाराचे तास बदलले होते. व्यवहाराच्या वेळा सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत बदलण्यात आल्या होत्या, त्यामुळे व्यवहाराचे तास अर्ध्या तासाने कमी करण्यात आले. पण आता परिस्थिती सुधारत आहे, त्यामुळे आता आरबीआयने जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बाजारातील ट्रेडिंग सकाळी 10 वाजण्या ऐवजी आता सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!