🕒 1 min read
मुंबई: रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL 2022 मध्ये सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आयपीएलचे ४ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या संघाकडून अशा कामगिरी निराश करणारी ठरत आहे. नुकताच चेन्नईने गुजरात विरुद्ध सामना खेळला. जो गुजरात संघाने ३ विकेट्स राखून जिंकला. दरम्यान या मॅचच्या १७व्या ओव्हरमध्ये कॅप्टन रवींद्र जडेजा (ravindra jadeja) शिवम दुबेवर (shivam dube) भडकताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
झाले असे की , गुजरातच्या डावात चेन्नईला (CSK) १७व्या षटकात मिलरला (david miller) बाद करण्याची सुवर्णसंधी होती. जी त्यांनी दुबेमुळे गमावली . ड्वेन ब्राव्होच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड मिलरने फटका लगावला. जो बरोबर टायमिंग न झाल्याने चेंडू काही काळ हवेतच राहिला. चेंडू आरामात कॅच झाला असता मात्र तो शिवम दुबेपासून हाकेच्या अंतरावर पडला आणि दुबे त्याला केवळ बघत राहिला.
I feel for Jaddu ???? #ShivamDube didn’t even attempt that one! But this ain’t as criminal as letting #vijayshankar be a part of the playing XI! @gujarat_titans what were you even thinking? #CSKvsGT pic.twitter.com/4X65j2mBLa
— SRH Fan (@kaarthikdas) April 17, 2022
शिवम दुबेने थोडे प्रयत्न केले असते तर मिलर बाद झाला असता. पण त्याने अजिबात प्रयत्न केला नाही. त्यामुळे कर्णधार रवींद्र जडेजा मैदानावर रागाने लाल झालेला दिसला आणि त्याने संतापत डोक्यावरची कॅप काढली. मिलरचा हा कॅच पकडली गेली असती , तर सीएसकेचे सामन्यात पुनरागमन होण्याची शक्यता होती. मात्र खराब फिल्डिंगमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- BANK खाते धारकांसाठी महत्वाची बातमी! आता कामे लवकर होणार!
- गणेश नाईकांवरील ‘त्या’ आरोपानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- IPL 2022 : “ताई, तुला माझा अभिमान….”, बहिणीच्या निधनानंतर हर्षल पटेल झाला भावूक; शेअर केलं पत्र!
- IPL 2022: धक्कादायक! दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळाडू निघाला कोविड पॉझिटिव्ह, संपूर्ण संघ क्वारंटाईन
- “राज ठाकरेंना जाग आली असेल तर चांगलच आहे” ; किशोरी पेडणेकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
