Share

ऐश्वर्यानं इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन काढून टाकले धनुषचे नाव!

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत काही दिवसांपूर्वीच विभक्त झाले  आता वैवाहिक नातं संपल्यानंतर धनुषची पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतनं आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे धनुषच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वीच धनुषनं पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्याला ९ वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुनरागमन केल्याच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही पोस्ट बरीच चर्चेत होती. या पोस्टमध्ये धनुषनं ऐश्वर्याचा उल्लेख मैत्रीण असा केला होता. त्याच्या या पोस्टनंतर ऐश्वर्यानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये मोठा बदल केला आहे. तिनं आपल्या सोशल मीडियावर हॅन्डलवरून धनुषचं नाव काढून टाकलं आहे. धनुषच्या पोस्टनंतर ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर केलेल्या या बदलामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ऐश्वर्यानं तिच्या ट्विटर हॅन्डवरून धनुषचं नाव काढून टाकत आता ते ऐश्वर्या रजनीकांत असं केलं आहे. मात्र तिचं युजरनेम अद्याप ऐश्वर्या आर धनुष असंच आहे. त्याआधी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर हॅन्डलच्या बायोमधूनही धनुषचं नाव काढून टाकलं होतं. मागच्या आठवड्यात धनुषनं ऐश्वर्याचं गाणं ‘पयानी’साठी शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्याच्या दिग्दर्शनात तयार झालेलं हे गाणं हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित झालं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!